Home संगमनेर संगमनेर: सुनेकडून सासूला मारहाण, कोंबड्या घराबाहेर हुसकावून लावल्याने….

संगमनेर: सुनेकडून सासूला मारहाण, कोंबड्या घराबाहेर हुसकावून लावल्याने….

Sangamner Crime: घरात आलेल्या कोंबड्या हुसकावून लावल्याने सुनेने सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना.

Sangamner Crime Mother-in-law beaten by daughter-in-law

संगमनेर: घरात आलेल्या कोंबड्या हुसकावून लावल्याने सुनेने सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील हाळदेवस्ती साकुर येथे घडली. ही घटना येथे ७ जून रोजी घडली. याबाबत १२ जुलै रोजी जिल्हा रुग्णालय नगर येथून सासूचा जबाब टपालाने पोलिस ठाण्यास प्राप्त झाल्याने सुनेविरुद्ध घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी सुंदरबाई दत्तृ भुतांबरे (वय ५५ वर्षे, रा. हाळदेवस्ती, साकुर, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) यांनी दिलेल्या जबाबावरून शिल्पा दीपक भुतांबरे व शीतल (पूर्ण नाव माहीत नाही.) दोन्ही रा. हाळदेवस्ती साकुर, ता. संगमनेर यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  सुंदराबाई यांची सून शिल्पा हिच्या कोंबड्या सुंदराबाई यांच्या घरात आल्या. त्या घराबाहेर हुसकावून लावल्याने शिल्पा हिला राग आला. शिल्पा आणि शीतल यांनी सुंदराबाई यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांनी जबाब दिला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल जी. पी. लोंढे हे करीत आहेत.

Web Title: Sangamner Crime Mother-in-law beaten by daughter-in-law

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here