Home क्राईम अजब प्रकार ! चक्क सोन्याच्या दुकानात देशीची विक्री

अजब प्रकार ! चक्क सोन्याच्या दुकानात देशीची विक्री

Jalana Crime: ६ हजार ६०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ६६ बाटल्या जप्त (Seized).

Pretty much a local sale in a gold shop alcohol Seized

जालना : परतूर तालुक्यातील संकनपुरी येथील साईकृपा ज्वेलर्समध्ये सुरू असलेल्या दारू विक्रीच्या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला आहे. चक्क सोन्याच्या दुकानात देशी दारूची विक्री केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मुकुंद किसनराव शहाणे हे त्यांच्या साईकृपा ज्वेलर्समध्ये देशी दारूची विक्री करीत असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. या माहितीवरून शनिवारी सायंकाळी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ६ हजार ६०० रुपये किमतीच्या देशी दारूच्या ६६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोकॉ भरत ढाकणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Pretty much a local sale in a gold shop alcohol Seized

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here