भंडारदरा, निळवंडे धरणांतून विसर्ग वाढवला नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Ahmednagar News: निळवंडे धरणातून ७ हजार ८०० क्यूसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात झेप घेत आहे.
राजूर: भंडारदरा धरणातून 7 हजार 678 क्युसेक तर निळवंडे धरणातून 7 हजार 800 क्युसेक विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीत चांगली वाढ झाली आहे. अकोले येथील अगस्ति सेतू पूल पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर वाढल्यास निळवंडेच्या विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे.
रविवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणातून ७ हजार ६७८, तर निळवंडे धरणातून ७ हजार ८०० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. नदीकाठच्या गावांना जलसंपदा विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस पडत आहे. काल रविवारी दुपारपर्यंत भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भंडारदर्याच्या विसर्गात कालच्या तुलनेत वाढ करण्यात आली. सकाळी भंडारदरा धरणाचा विसर्ग 5 हजार 438 क्युसेक होता. सायंकाळी तो 7 हजार 678 क्युसेक करण्यात आला. भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होते. भंडारदरा ते निळवंडे धरण दरम्यानचे ओढे नाले तसेच कृष्णवंती नदीलाही चांगले पाणी आले आहे.
आज सकाळपर्यंतचा पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे- घाटघर 114, रतनवाडी 110, पांजरे 89, भंडारदरा 73, वाकी 53, निळवंडे 18, अकोले 6, कोतुळ 5, भंडारदरा येथे दिवसभरात 30 मिमी पावसाची नोंद झाली. धरणांमधील पाणी साठा दलघफू भंडारदरा 11 हजर 39 (100 टक्के), निळवंडे 7 हजार 112 (85.40 टक्के) आढळा 915 (86.32 टक्के) मुळा धरणाचा पाणी साठा सकाळी 21 हजार 145 दलघफु (81.33 टक्के) होता. तर कोतुळ जवळ मुळा नदीचा विसर्ग 2 हजार 984 क्युसेक होता.
असलेल्या पाण्यामुळे निळवंडे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून रविवारी सायंकाळी सहा वाजता निळवंडे धरणातील पाणीसाठा ८५ टक्क्यांहून अधिक म्हणजेच ७ हजार ११२ द.ल.घ.फू. इतका झाला होता. धरणातून रविवारी सायंकाळी सहा वाजता ७ हजार ८०० क्यूसेकने पाणी प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
Web Title: Bhandardara, Nilavande Dams increased discharge alert warning
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App