Home पुणे खळबळजनक! कारागृहात कैद्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या

खळबळजनक! कारागृहात कैद्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Pune Crime: येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

prisoner committed suicide by hanging himself with a towel in the jail

पुणे: येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

येरवडा पोलीस ठाण्यात सदर घटनेत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगेश विठ्ठल भोर (वय ३०, रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भोरविरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीच्या खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने त्याची १६ जुलै २०२३ रोजी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. गेल्या ७ महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

कैद्यांना सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी कारागृहाच्या आवारात सोडण्यात आले. तेथील मेडिकल स्टोअरच्या बाजूला मोकळ्या जागेत मंगेशचा मृतदेह आढळून आला. त्याने टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केलीये. आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. त्याच्यावर कारागृहात मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: prisoner committed suicide by hanging himself with a towel in the jail

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here