Home नागपूर हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट, १५ वर्षांच्या मुलीला ग्राहकांच्या खोलीतून ताब्यात

हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट, १५ वर्षांच्या मुलीला ग्राहकांच्या खोलीतून ताब्यात

Breaking News | Nagpur Sex Racket: सेक्स रॅकेट सुरु असल्याचे उघडकीस, १५ वर्षांच्या मुलीला देहव्यापार करताना ताब्यात घेण्यात आले.

Sex racket in hotels, 15-year-old girl detained from customer's room

नागपूर : शहरातील मोठमोठ्या ‘ओयो’ हॉटेल्समध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचे समोर आले आहे.  बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कृष्णकुंज हॉटेलमध्ये पोलिसांनी छापा (Raid) घातला. या छाप्यात १५ वर्षांच्या मुलीला देहव्यापार (prostitutions) करताना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी हॉटेल मालक राकेश बलवीरसिंह चावला (५५) आणि मुलगा आशिष राकेश चावला (रा. छत्रपती चौक) यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक देहव्यापाराचे अड्डे सुरु असून त्याला पोलीस आणि गुन्हे शाखेचे एसएसबी पथकातील कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण सहकार्य आहे. त्यामुळे मनिषनगर परिसरातील अनेक हॉटेल्स आणि ओयो हॉटेल्समध्ये देहव्यापार पोलिसांच्याच आशिर्वादाने सुरु असल्याचे समोर आले आहे. मनिषनगरातील श्रीजी ऑटोमोबाईल्सजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळील कृष्णकुंज ओयो हॉटेलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अल्पवयीन मुलींना आंबटशौकीन ग्राहकांसाठी आणण्यात येत असल्याची माहिती होती.

हॉटेल मालक राकेश चावला आणि आशिष चावला हे दोघेही बापलेकांनी काही अल्पवयीन मुलींना देहव्यापारासाठी हॉटेलमध्ये बोलविण्याच्या कामासाठी तिघांना ठेवले होते. व्यवस्थापक धीरज रविंद्र खुळे (राकेश लेआऊट), गजानन रामहरी सोनवणे (४०, अमर संजय सोसायटी, मनिषनगर) आणि अलोक राजेंद्र रैकवार (सिद्धिविनायक मंदिरजवळ,रमानगर) या तिघांनी ८ ते १० तरुणी आणि अल्पवयीन मुलींना ओयोमध्ये ठेवले होते. तेथे आंबटशौकीन ग्राहकांना ५ ते १०हजार रुपये घेऊन मुली उपलब्ध करून देत होते. मात्र, मुलींना ५०० ते १००० रुपये देऊन त्यांचे आर्थिक आणि लैंगिक शोषण केले जात होते.

एसएसबी पथक देहव्यापाराच्या अड्ड्यांवर कारवाई करीत नसल्याचे लक्षात येताच गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक श्याम सोनटक्के, सहायक निरीक्षक अयुब संदे, अविनाश जायभाये यांच्या पथकाने मनिषनगरातील श्रीजी ऑटोमोबाईल्सजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळील कृष्णकुंज ओयो हॉटेलवर छापा घातला. १५ वर्षाच्या मुलीला ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेतले. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

Web Title: Sex racket in hotels, 15-year-old girl detained from customer’s room

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here