Home क्राईम Rape | धक्कादायक!  खासगी बस चालकाने प्रवासी महिलेवर केला बलात्कार

Rape | धक्कादायक!  खासगी बस चालकाने प्रवासी महिलेवर केला बलात्कार

Private bus driver rape passenger woman

Pune Crime | पुणे: पुण्यातून धक्कादायक वृत्त समोर आले आहे. कात्रजमध्ये खासगी बस चालकाने प्रवासी महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने संताप व्यक्त होत आहे.

याप्रकरणी पिडीत महिलेने फिर्याद दिली असून आरोपी बस चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. . नवनाथ शिवाजी भोंग (38) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,  पीडित महिला वाशीम जिल्ह्यातील रहिवाशी असून ती गुरूवारी एका खासगी बसने आपल्या पतीसोबत पुण्यात आली होती. रात्री पुण्यात आल्यानंतर दोघेही राहण्यासाठी खोली शोधत होते. मात्र, रात्री उशीर झाल्यामुळे खासगी बस चालकाने या दाम्पत्याला ट्रॅव्हल्समध्येच झोपण्यास सांगितले. दोघेही नवीन असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्समध्ये झोपण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही वेळाने महिलेचे पती लघुशंकेसाठी गेले.

महिलेचे पती लघुशंकेसाठी गेल्याचे बघताच, महिलेवर लक्ष ठेवून असलेल्या आरोपी नवनाथ याची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार (Rape) केला. तर पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. दरम्यान महिलेचा पती  तिला शोधत होता. पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत चालकास अटक केली आहे.

Web Title: Private bus driver rape passenger woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here