Home बीड धक्कादायक! विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क महिलने पतीचा काटा काढला

धक्कादायक! विम्याचे एक कोटी मिळविण्यासाठी चक्क महिलने पतीचा काटा काढला

Murder woman pulled out her husband's fork to get a crore of insurance

बीड: बीडमधून पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. १ कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी एका महिलेने सुपारी देऊन पतीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक  घटना समोर आली आहे. डोक्यात टामीने हत्या करून मारेकर्यांनी अपघात झाल्याचे भासविले मात्र बीड पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. मंचक पवार असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  11 जून रोजी पहाटे मंचक पवार यांचा मृतदेह अहमदनगर महामार्गावरील बीड पिंपरगव्हाण रस्त्यावर आढळून आला होता.  यामध्ये स्कुटीला वाहनाने धडक दिल्यासारखा अपघात झाल्याचं भासविण्यात आलं होतं. तर यादरम्यान पत्नीच्या चेहऱ्यावर काहीच दुःख नसल्याचं दिसून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय बळावला गेला.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत मयत मंचक पवार यांच्या पत्नीनेच, पतीच्या नावाने काढलेला 1 कोटी रुपयांचा विमा पदरात पाडून घेण्यासाठी, 10 लाख रुपयांची दिली. त्यापैकी 2 लाख रुपये इसार म्हणून मारेकऱ्यांना देऊन पती मंचक यांचा काटा काढल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी आरोपी पत्नी, श्रीकृष्ण बागला, वैजीनाथ गव्हाणे व अन्य दोघांवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यातील पत्नीसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सुपारी घेणाऱ्या फरार आरोपींचा तपास सुरू आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

Web Title: Murder woman pulled out her husband’s fork to get a crore of insurance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here