Home बीड स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; संशयित 2 महिलांना ताब्यात

स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; संशयित 2 महिलांना ताब्यात

Breaking Crime News:  परळीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय (prostitution business ), दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

prostitution business under the name of spa Suspect 2 women detained

बीड: बीडमधील परळी शहरातील महेश कॉम्प्लेक्स परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या ठिकाणी फ्लोरा स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चौकशीसाठी २ महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,, फ्लोरा स्पा या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिची परळी पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून परळी शहर पोलिसांनी फ्लोरा स्पावर धाड टाकून कारवाई केलीय. या कारवाई दरम्यान त्या ठिकाणी पुण्याहून आलेल्या 2 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. खरचं येथे स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहे का? याप्रकरणी अधिक तपास  परळी शहर पोलीस करत आहेत.

बीडमध्ये जुलै २०२३ मध्ये देखील अशीच एक घटना घडली हेती. एका कला केंद्राच्या नावाखाली अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. पोलिसांनी कला केंद्रावर छापा टाकून ५ अल्पवयीन मुलींसह काही महिलांची सुटका केली होती. तसेच या प्रकरणी ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: prostitution business under the name of spa Suspect 2 women detained

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here