Home महाराष्ट्र पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या करून मृतदेह नदीत फेकला

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या करून मृतदेह नदीत फेकला

Breaking News | Crime: पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने दोन साथीदारांच्या मदतीने २३ वर्षीय तरुणाची हत्या (Murder) करून मृतदेह कुर्ल्यातील मिठी नदीमध्ये फेकल्याची घटना उघडकीस. तिघांना अटक.

suspicion of having an immoral relationship with his wife, the young man was Murder and the body was thrown into the river

मुंबई : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने दोन साथीदारांच्या मदतीने २३ वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह कुर्ल्यातील मिठी नदीमध्ये फेकला होता. याबाबत गुन्हे शाखेने तपास करून तीन आरोपींना अटक केली.

कुर्ला पोलिसांना ५ जानेवारी रोजी कुर्ल्या येथील एमटीएनएल जंक्शन परिसरातील मिठी नदीच्या पात्रात एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला होता. याबाबत कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याचदरम्यान गुन्हे शाखा परिमंडळ ४ ने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करून मृतदेहाची ओळख पटवली.

अमान शेख असे या मृत तरुणाचे नाव असून तो गोवंडी परिसरात वास्तव्यास होता. पोलिसांनी परिसरात अधिक चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी तिघांपैकी एका आरोपीसोबत अमानचा वाद झाल्याचे समजले. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गोवंडी परिसरातून तिघांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची माहिती दिली. आरोपींनी तरुणाला घरी बोलावले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केल्याचे समोर आले  तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तरुणाचा मृतदेह मिठी नदीत फेकून दिला, असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: suspicion of having an immoral relationship with his wife, the young man was Murder and the body was thrown into the river

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here