Home संगमनेर संगमनेर शहरात किरकोळ वादातून एकास बेदम मारहाण

संगमनेर शहरात किरकोळ वादातून एकास बेदम मारहाण

Breaking News | Sangamner Crime: मागील किरकोळ वादातून टेलर असलेल्या इसमाला ८ ते १० जणांनी मिळून लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना.

Sangamner city, a man was beaten up due to a petty dispute Crime Filed

संगमनेर: मागील किरकोळ वादातून टेलर असलेल्या इसमाला ८ ते १० जणांनी मिळून लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना शहरातील मदिना नगर  येथे बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या समुरास घडली. याप्रकरणी शहर पोलीसांनी ४ जणांसह इतर ४ ते ५. अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी चाँद बहादूर खान (टेलर, रा. अलकानगर, संगमनेर) हे मदिनानगर येथून जात असतांना आरोपी नदीम, सोफियान बागधान, हुसेफ, अजर पल्बर व इतर ४ ते ५ जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून  फिर्यादी चांद खान यांना किरकोळ वादातून काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत जीवेदार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत फिर्यादी चाँदखान यांना चांगलीच दुखापत झाली, किरकोळ वादातून जीवावर बेतणारी मारहाण करण्यात आली.

याप्रकरणी आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नं. २१/२०२४ भादवि कलम १४३, १४७, १rc. txt. ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक भगवान मधुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक महाले करत आहे.

Web Title: Sangamner city, a man was beaten up due to a petty dispute Crime Filed

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here