Home क्राईम पत्नीला दिरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत बघितले अन…

पत्नीला दिरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत बघितले अन…

Breaking Crime News: मोठ्या भावाच्या पत्नीसोबत दिराचे अनैतिक संबंध जुळले. घरातच दिरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत भावाला दिसल्याने दोन भावात वाद झाला. त्यानंतर पत्नीला नेहमी मारहाण करीत त्रास देत असल्यामुळे भावाचा लहान भावाने सुपारी देऊन खून (Murder) केल्याची घटना उघडकीस.

wife was seen with Dira in a 'want that' murder

नागपूर : नागपूरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच कुटुंबात राहणाऱ्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत दिराचे अनैतिक संबंध जुळले. घरातच दिरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत भावाला दिसल्याने दोन भावात वाद झाला. त्यानंतर पत्नीला नेहमी मारहाण करीत त्रास देत असल्यामुळे भावाचा लहान भावाने खून केला. विटाभट्टीच्या मातीत त्याचा मृतदेह पुरला. मात्र, पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावून दोघांना अटक केली.

विशाल आणि चंदू (दोन्ही बदललेले नाव) हे दोघेही भाऊ वडिलोपार्जित सुरादेवी परीसरातील विटाभट्टीचा कारखाना सांभाळत होते. मोठ्या भावाचे मोठ्या धुमधडाक्यात लग्न झाले. घरात आनंदी आनंद वातावरण होते. काही दिवसांतच विशालला दारूचे व्यसन असल्यामुळे तो पत्नीशी नेहमी वाद घालून मारहाण करीत होता. त्यावेळी चंदू हा वहिनीची बाजू घेऊन भावाची समजूत घालत होता. त्यामुळे वहिनीचे दिराशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. दोघांचेही चांगले पटत होते. चंदन घरातील कामात वहिनीला नेहमी मदत करीत होता. त्यामुळे दोघांमध्ये सूत जुळले. दोघांचेही अनैतिक संबंध निर्माण झाले. यादरम्यान चंदूचे लग्न झाले. त्यानंतरही चंदूचे वहिनीशी अनैतिक संबंध कायम होते.

बेडरुममध्ये वहिनी आणि दिर एकाच बेडवर झोपले होते. दरम्यान, दारुडा असलेला विशाल घरी आला. त्याने खिडकीतून दोघांनाही ‘नको त्या’ अवस्थेत बघितले. त्याचा पारा चढला. त्याने भावाला मारहाण केली आणि त्यानंतर पत्नीलाही जबर मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही अनैतिक संबंधाची बाजू धरुन मारहाण करीत होता. अन्य कुटुंबियांना दोघे भावात काय घडले, याची कल्पना नव्हती. वारंवार पती मारहाण करीत असल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हापासून विशालनेही विटाभट्टीतच एक खोली तयार केली आणि तेथेच राहू लागला.

विलास नेहमी चंदूसह आई-वडिलांना मारहाण करीत होता. त्यानंतर तो पत्नीच्या माहेरी जाऊनही तिला मारहाण करीत होता. विशालचा वाढता त्रास बघता मे २०२३ मध्ये चंदूने मनोहर या वाहनचालकाला ७ लाखांत सुपारी दिली. चंदू आणि मनोहरने विशालच्या डोक्यात सत्तूर घालून खून केला. विटाभट्टीतच मृतदेहाची विल्हेवाट लावली. तेव्हापासून घरात शांतता होती तर या हत्याकांडाची कुणकुणही कुणाला नव्हती.

गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून या हत्याकांडाचा उलगडा झाला नाही. मात्र, मनोहरने सुपारीचे पैसे मागितले असता चंदूने १ लाख रुपये दिले आणि उर्वरित पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. मनोहर नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन पैसै न दिल्यास पोलिसांना सांगेल, अशी धमकी देत होता. शेवटी त्याने दारुच्या नशेत अनेकांना खून केल्याचे सांगितले. कोराडी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हत्याकांड उघडकीस आला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

Web Title: wife was seen with Dira in a ‘want that’ murder

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here