Home अकोले अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने एसटीच्या सुविधा उपलब्ध करून देऊ – आगारप्रमुख आव्हाड...

अकोले तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने एसटीच्या सुविधा उपलब्ध करून देऊ – आगारप्रमुख आव्हाड यांचे अश्वासन

अकोले : एसटी बस सेवेचे पहिले प्राधान्य विद्यार्थ्यांनाच असून, त्यांना प्राधान्याने एसटीच्या सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही अकोले आगार प्रमुख ज्ञानेश्वर आव्हाड यांनी दिली. एसटी पासधारक विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर अकोले पंचायत समितीमध्ये माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे व पं. स. उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पासधारक विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला..

अकोले येथे शाळा महाविद्यालय, कॉलेजच्या शिक्षणासाठी येत असलेल्या हजारो विद्यार्थांचा एसटी बसचा प्रश्न दररोज सातत्याने उद्भवत असल्याने यावर कायमची उपाययोजना करण्यासाठी अकोले आगाराचे आगार प्रमुख तसेच अकोले शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, कॉलेजमधील सर्व मुख्याध्यापकांची समन्वय बैठक उपसभापती मारुती मेंगाळ यांनी काल अकोले येथील पंचायत समिती, सभागृहात आयोजित केली होती. या बैठकीत एसटी बस सेवेत पहिले प्राधान्य पासधारक विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. अकोले शहरात अगस्ती कॉलेज, मॉडर्न कॉलेज, अभिनव कन्या विद्या मंदिर, अगस्ती महाविद्यालय, पॉलिटेक्निक कॉलेज इत्यादी शाळा-महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून यापैकी पासधारक विद्यार्थ्यांची संख्या ३ ते ४ हजार असल्याने बससेवेच्या नियोजन अभावामुळे विद्यार्थ्यांना बसस्थानकावर तासन्तास ताटकळत उभे रहावे लागते. अनेकदा वेळेत बस उपलब्ध नसल्याने वेळेत जाता येत नाही. त्यामुळे या प्रश्नांवर बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अकोले शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, कॉलेजेसमधील मुख्याध्यापकांनी आपल्या महाविद्यालयात प्रवेश असलेल्या विद्यार्थ्यांची अकडेवारी सादर केली. गावनिहाय विद्यार्थ्यांची आकडेवारी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सादर करण्याच्या सूचना सर्व मुख्याध्यापकांना करण्यात आल्या असून या आकडेवारीवर सर्व कॉलेज, बस फे ऱ्या सुरळीत होणार आहे.

 त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालय बसस्थानक परिसरात मुला- मुलींच्या छेडछाडीचे प्रकार, रॅगिंगचे प्रकार थांबण्यासाठी तसेच बस स्थानकावरची मुला मुलींची गर्दी कमी करण्यासंदर्भात नवीन उपाययोजना राबविण्यात येणार असल्याने लवकरच या संदर्भात पुढील बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे, सभापती सौ. रंजनाताई मेंगाळ, उपसभापती मारुती मेंगाळ, जि. प. सदस्या सौ. सुषमाताई दराडे, सदस्य सौ. सीताबाई गोंदके, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, शिक्षण अधिकारी कुमावत, आगार प्रमुख आव्हाड, सचिन वाकचौरे, अगस्ती कॉलेजचे प्रा. चव्हाण, कन्या विद्यामंदिर मुख्याध्यापक जेडगुले, प्राचार्य संतोष कचरे, प्रा. गीताराम अभंग, आरपीआयचे नेते राजू गवांदे, अंकुश शेटे, रामदास गावंडे, संदीप डोंगरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Website Title: Provide Convenience To ST Students In Akole Taluka With Priority – Ashavadhar Avhad’s Ashwasan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here