Home अकोले आदिवासी गावांना रॉकेल देण्याची ग्राहक पंचायतीची मागणी

आदिवासी गावांना रॉकेल देण्याची ग्राहक पंचायतीची मागणी


अकोले :
अहमदनगर जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात एकदा पाऊस सुरू झाला कि तो किमान ३ ते ४ महिने उघडत नाही. त्यामुळे या परिसरातील आदिवासी बांधवांचा शहरी बाजारपेठेशी संपर्कच कमी होतो. संततधार पावसामुळे रस्ते वाहुन जातात. रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे पावसाळ्यात आदिवासी बांधवांना गॅस वेळेवर मिळत नाही. म्हणून अकोले तालुक्याच्या पश्ि­चम भागातील आदिवासी बांधवांसाठी शासनाने रॉकेलची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे..

गावांना रॉकेल देण्याची मागणी

पावसाळ्यात तालुक्याच्या पश्चिम भागातील आदिवासी बांधवांची चुल देखील लवकर पेटत नाही. तसेच अतिवृष्टीमुळे वीजेचे देखील तीनतेरा वाजलेले असतात. अशा वेळेस उजेडासाठी दिवा किंवा कंदिलाशिवाय त्यांना दुसरा पर्याय नसतो. या सर्व अडचणी लक्षात घेऊन ग्राहक पंचायतीच्या वतीने अकोल्याचे तहसिलदार यांना पत्र देण्यात आले आहे. तसेच या पत्राच्या प्रती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी अहमदनगर तसेच खा.सदाशिवराव लोखंडे यांना देखील पाठविण्यात आल्या आहेत. या प्रश्­नी खा. लोखंडे यांनी पुरवठा विभागाला तात्काळ कार्यवाही करण्याबाबत सुचना देऊन लवकरच याबाबत कार्यवाही होईल असे सांगितले आहे. यावेळी ग्राहक पंचायतचे अध्यक्ष मच्छद्रिं मंडलिक, सचिव दत्ता शेणकर, सहसंघटक रमेश राक्षे, दत्ता रत्नपारखी, कार्याध्यक्ष महेश नवले, ॲड. दीपक शेटे, ॲड.भाऊसाहेब वाळुंज, कैलास तळेकर, राम भांगरे, सखाराम खतोडे, माधवराव तिटमे, ज्ञानेश पुंडे, रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, सुदिन माने, भाऊसाहेब वाकचौरे, किरण चौधरी, नरेंद्र देशमुख, राम रूद्रे, सुनिल देशमुख, रामदास पवार, सुदाम मंडलिक, सुरेश पवार, गंगाराम धिंदळे, गणपत थिगळे, विजय वाघ, जालिंदर बोडके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Website Title: Consumer Panchayat Demand To Give Kerosene To Tribal Villages

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here