Home अकोले बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी;अकोले तालुक्यातील रंधा धबधब्याजवळील घटना

बिबट्याच्या हल्ल्यात मुलगी जखमी;अकोले तालुक्यातील रंधा धबधब्याजवळील घटना

भंडारदर: अकोले तालुक्यातील रंधा धबधब्याजवळ संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आपल्या शेतात काम करत असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात ही मुलगी गंभिर जखमी झाली असून, नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयात या मुलीवर उपचार करण्यात येत आहेत.

अकोले तालुक्यातील रंधा धबधब्याच्या शिवारात अनिता बाळू पटेकर ही अल्पवयीन मुलगी संध्याकाळच्या सुमारास शेतात गेली असता दाट झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने थेट अनितावर हल्ला चढविला. तिने आरडोओरडा केल्याने बिबट्याने पलायन केले. बिबट्याच्या हल्यात अनिता गंभीर जखमी झाली असून तिच्या डोक्याला ओरखडले आहे, तर चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. अनिताला तात्काळ राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या रुग्णालयात रेबिजची लसच उपलब्ध नसल्यानेतिला वनविभागाकडून तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिची प्रकृती सिथर असल्याची माहिती राजूर प्रादेशिक वनविभागाचे आधिकारी दिलीपराव जाधव यांनी दिली आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पावसाळा सुरू असल्याने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होईला का? असाही प्रश्न वनविभागाला पडला आहे.

Website Title:  The Girl Was Injured In A Leopard Attack; The Incident Near Randhha Waterfalls In Akole Taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here