भंडारदरा पानलोटातील रतनवाडीत तीन तासात साडेतीन इंच पाऊसाची नोंद
भंडारदरा: भंडारदरा धरणाच्या पाणलोटात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने कहर केला असुन एकट्या रतनवाडीत तीन तासात साडेतीन इंच पावसाची नोंद झाली आहे. पुर्नवसु नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाचा जोर वाढला असून आदिवासी बांधवांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये सातत्याने वाढ होत असून शनिवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत भंडारदरा धरणाच्या पाणीसाठा १३७२ दलघफु झाला होता.
उत्त्रर नगर जिल्ह्याची जीवनदायनी समजल्या जाणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोटात तसेच परीसरातील गावांमध्ये पुर्नवसु नक्षत्रामध्ये पावसाने धुव्वाधार बरसणे दुसऱ्याही दिवशी सुरुच ठेवले आहे. भंडारदरा धरणावर मागिल आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले असून दिड दिवस आकांडतांडव केल्यानंतर पावसाने अचानक विश्रांती घेतली होती. परंतु आद्रा नक्षत्राच्या शेवटी त्याने पुन्हा रुद्रावतार दाखविण्यास सुरुवात केली आहे. या प्रचंड पावसामुळे नदी- नाले तुडूंब भरून वाहते झाले आहेत. नदीनाल्यांचे पाणी भंडारदरा धरणाच्या पोटात विसावत आहे.
शुक्रवारी दुपारी रतनवाडी येथे दुपारी एक ते चार या तिन तासात तर पावसाने विक्रमाची नोंद केली. येथील पांडुरंग झडे यांनी तीन तासात ९२ मीमी म्हणजेच साडेतीन इंच पाऊस पडला असल्याचे सांगितले. रतनवाडी, घाअघर, साम्रद, उडदावणे, कोलटेंभे या परीसरात मुसळधार पाऊस पडत आहे. भंडारदरा धरणाचे पाणीही वेगाने वाढण्यास सुरुवात झाली आहे. या पावसामुळे भातखाचरांमध्ये पाणीच पाणी झाले असून आदिवासी शेतकऱ्यांना आता आवणीचे वेध लागले आहेत. गेल्या चोवीस तासात भंडारदरा येथ्े ९७ मीमी पाऊस पडला असुन घाटघर १२२ मी.मी, वाकी येथे ६२, रतनवाडी १२२ मी.मी इतकी पावसाची नोंद झाली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा संध्याकाळपर्यंत १३७२ दलघफु झाला होता. चोविस तासात भंडारदरा धरणात ४०२ दलघफु नविन पाणी आले आहे.
Websit Title: Rainfall In Panaldota In Ratnawadi Is Three And A Half Times In Three hours