Home अकोले धामणगाव पाट येथे मजुराची गळफास घेऊन आत्महात्या

धामणगाव पाट येथे मजुराची गळफास घेऊन आत्महात्या

अकोले: भाडोत्री घेतलेल्या खोलीत एका मालमजुरी करणाऱ्या इसमाने पत्र्याच्या शेड मध्ये अँगलला नयलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महात्या. केल्याची घटना शुक्रवारी धामनगाव पाट शिवारात घडली.

सीतारम सखाराम जगताप वय ३४, धंदा-मजूरी, राहणार, शिसवद-राजूर ता. अकोले, हल्ली रा. धामणगाव पाट असे आत्महात्या केलेल्या इसमाचे नाव आहे.

याबाबत अकोले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार की माधव मनाजी शेळके यांचे पत्र्याच्या भाडोत्री घरामध्ये सीताराम मनाजी जगताप हे राहत होते. ते मोलमजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांनी शुक्रवारी १.३० वाजेच्या सुमारास पत्र्याचे शेड मध्ये असणाऱ्या अँगलला नायलॉन दोरी बांधून गळफास घेऊन आत्महात्या केली. याबाबत धामनगाव पाटचे पोलीस पाटील लक्ष्मण रामनाथ चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार सुनील साळवे हे करीत आहेत.

Website Title: Suicide, With The Help Of A Laborer In Dhamangaon Pat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here