Home अहमदनगर तरुणीचा मृतदेह जाळून टाकलेल्या अवस्थेत आढळला

तरुणीचा मृतदेह जाळून टाकलेल्या अवस्थेत आढळला

Rahata body of the girl was found burnt

राहता | Rahata: राहता तालुक्यातील बाभळेश्वर राजुरी शिवारात राजुरी हद्दीत पायरेन्स रस्त्यालगत एका तरुणीचा मृतदेह जाळून टाकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

हा मृतदेह पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतकरी आपल्या कामावर जात असताना याच भागात राहणाऱ्या शेतकऱ्याला सकाळी जाताना काहीतरी जळलेल्या अवस्थेत आढळून आले. त्याने जवळ जावून चांगले पाहिले असता हा मृतदेह एका तरुणीचा असल्याचे लक्षात आले.

हा मृतदेह अर्धवट जळालेला होता. तरुणीचा रंग गोरा होता. ती शरीराने उंच होती. काही कपडे अर्धवट जळालेल्या अवस्थेत होते.

हा प्रकार कोणतरी घडून आणल्याचे दिसून येत आहे. सदर महिलेच्या अंगावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिचा खून करण्यात आला असावा असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. सदर घटना ही लोणी परिसरातील पोलिसांच्या हद्दीत येते.

लोणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाठैल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे. सदर तरुणी कोण आहे. कशासाठी खून केला असावा याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Rahata body of the girl was found burnt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here