निळवंडे धरणाचे संपूर्ण काम २०२४ पर्यंत पूर्ण होणार: जयंत पाटील
संगमनेर | Sangamner: अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे संपूर्ण काम २०२३-२४ पर्यंत पूर्ण होईल. पाणी हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असून ते आले पाहिजे असा सहकार महर्षी दिवंगत भाऊसाहेब थोरात यांचा होता.
निळवंडे धरणाचे काम पूर्ण झाल्यावर संगमनेर तालुक्यात ऊस क्षेत्रात आणखी वाढ होईल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी आयोजित जयंती महोत्सव याप्रसंगी ते बोलत होते.
या व्यासपीठावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, उद्योजक राजेश मालपाणी, सत्यजित तांबे, आमदार लहू कानडे, आमदार डॉ. किरण लहामटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या महोत्सव प्रसंगी स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने जेष्ठ पत्रकार संजय आवटे तर डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डीसले यांना गौरविण्यात आले.
Web Title: Sangamner Work of Nilwande Dam will be completed by 2024 Jayant Patil