Home अहमदनगर धक्कादायक घटना: विवाहितेवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक घटना: विवाहितेवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी

Pathardi Threatening to kill a married woman by torturing 

पाथर्डी | Pathardi: पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारात हरबऱ्याच्या शेतात नेऊन अत्याचार केल्याची घटना गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.

सदर प्रकार कोणास सांगितल्यास जीवे ठार मारीन अशी धमकी देण्यात आली. याप्रकरणी योगेश पांडू कराळे रा. सोमठाणे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी शहरातील शेवगाव रस्त्याच्या बाजूला राहणारी विवाहित महीला तिसगावहून पायी मांडवे गावाकडे जात होती. या महिलेचा ओळखीचा असलेला योगेश कराळे तेथे येऊन या महिलेला शेजारीच असलेल्या हरबरयाच्या शेतात नेऊन अतिप्रसंग केला. या घटनेबाबत कोणाला काही सांगितले तर तुला ठार मारीन अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलने फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Pathardi Threatening to kill a married woman by torturing 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here