धक्कादायक घटना: दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार
राहता | Rahata: राहता तालुक्यातील एका गावतील १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी मंगळवारी २ फेब्रुवारीला अल्पवयीन मुलीच्या पालकांनी लोणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी एका ३३ वर्षीय व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी जालिंदर तुळशीराम वांगे वय ३३ राउत वस्ती निर्मळ पिंपरी ता. राहता असे नाव आहे. अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचा फायदा घेत तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ही घटना २४ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घडली आहे. या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असून लोणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Rahata Torture of a ten-year-old minor girl