Home संगमनेर Sangamner: संगमनेर तालुक्यात दोन दिवसांत ३२ जण करोना पॉझिटिव्ह

Sangamner: संगमनेर तालुक्यात दोन दिवसांत ३२ जण करोना पॉझिटिव्ह

Sangamner Taluka Two Days 32 Corona Positive

संगमनेर | Sangamner: तालुक्यात मंगळवारी २३ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर मंगळवारी ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. असे दोन दिवसांत एकूण ३२ बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यात मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहर ४३ वर्षीय पुरुष, परदेशपुरा येथे ५७ वर्षीय महिला, ६३ वर्षीय पुरुष, नेहरू चौक येथे ५५ वर्षीय पुरुष, रंगारगल्ली येथे १६ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, माळीवाडा येथे ७० वर्षीय महिला, मालदाड रोड येथे ४९ वर्षीय पुरुष असे ८ जण बाधित आढळून आले आहेत.

ग्रामीण भागातून निमगाव भोजापूर येथे ४० वर्षीय पुरुष, साकुर येथे ४५ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ५९ वर्षीय पुरुष, चिखली येथे ४६ वर्षीय पुरुष, पळसखेडे येथे २५ वर्षीय महिला, निमोन येथे ५२ वर्षीय महिला, वेल्हाळे येथे २६ वर्षीय तरुण, धांदरफळ खुर्द येथे ३० वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथे २० वर्षीय तरुणी, वाघापूर येथे २८ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ५५ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ४६ वर्षीय पुरुष, कोकणगाव येथे १८ वर्षीय तरुण, गोल्डन सिटी गुंजाळवाडी येथे ४० वर्षीय पुरुष असे १५ जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यात बुधवारी ९ जण करोनाबाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात शहरात मालदाड रोड येथे ४९ वर्षीय महिला, गणेशनगर येथे ६० वर्षीय पुरुष असे २ बाधित आढळून आले आहेत.  

ग्रामीण भागात वडगाव पान येथे ३० वर्षीय पुरुष, खांडगाव येथे ५८ वर्षीय पुरुष, चिखली येथे ८४ वर्षीय महिला, गोल्डन सिटी गुंजाळवाडी येथे ३४ वर्षीय महिला, रहिमपूर येथे ५१ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे २६ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय महिला असे ७ जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner Taluka Two Days 32 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here