Home अकोले अकोले:  कोल्हार घोटी रोडवर डंपर व स्कुटी गाडीचा भीषण अपघात, मायलेकी जखमी

अकोले:  कोल्हार घोटी रोडवर डंपर व स्कुटी गाडीचा भीषण अपघात, मायलेकी जखमी

Akole dumper and scooty Accident 

अकोले | Akole:  तालुक्यातील कोल्हार घोटी रोडवर रुंभोडी शिवारात  लोहटेवाडीजवळ डंपर व स्कुटी(मोपेड) गाडीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात इंदोरी येथील मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. 

कोल्हार घोटी राज्यमार्गावर रस्त्याचे काम करणारा डंपर राजूरच्या दिशेने जात असताना शाळेतून घरी येणाऱ्या शिक्षिका वैशाली नितीन नवले आणि त्यांची कन्या अवंतिका नवले यांच्या स्कुटी गाडीला डंपरने जोराची धडक दिली. या अपघातात स्कुटी गाडीवरील दोघी मायलेकी वैशाली नवले व अवंतिका नवले या जखमी झाल्या आहेत. जखमींना संगमनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात स्कुटी गाडी ही डंपरच्या समोरील चाकाखाली गेल्याने गाडीचा चक्काचूर झाला आहे. या अपघातवेळी घटनास्थळी नागरिकांनी मदत कार्य करून या मायलेकीना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली आहे. 

Web Title: Akole dumper and scooty Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here