आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीला पळविले, गुन्हा दाखल
राहुरी: राहुरी शहरातील एका कुटुंबातील १९ वर्षीय तरुणीला आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी परिसरातील राहणाऱ्या तरुणीस आरोपी सुरज घनगाव रा. शिर्डी याने लग्नाची मागणी घातली. मात्र त्यावेळी तरुणीने सुरज यांच्याबरोबर लग्न करण्यास नकार दिला होता. आरोपी सुरज घनगाव याच्यासह अन्य पाच जणांनी तरुणीस आमिष दाखवून राहुरी शहरातून पळविले असल्याचा संशय असून तशी फिर्याद मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुरज घनगाव, विजय घनगाव, विजय गायकवाड, रवी राजेन्द्र साळवे, ज्योती रवी साळवे सर्व रा. शिर्डी यांच्याविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Web Title: Rahuri 19-year-old girl kidnapped