Home अहमदनगर भूमाता बिग्रेडचा पदाधिकारी यांनी साई संस्थानाच्या फलकावर फेकले काळे

भूमाता बिग्रेडचा पदाधिकारी यांनी साई संस्थानाच्या फलकावर फेकले काळे

Black thrown on the board of Sai Sansthan

शिर्डी: साई भक्तांनी दर्शनाला येताना भारतीय वेशभूषेत यावे असे आवाहन करणाऱ्या फलकावर भूमाता ब्रिगेडच्या दोन महिलांनी व एका पुरुषाने काळे आईल फेकल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. भारतीय वेशभूषेत मंदिरात परवेश करावा या आवाहनाच्या फलकावरून गेल्या महिन्यात वादंग पेटले होते. १० डिसेंबर रोजी हा फलक हटविण्याचा इशारा दिला होता. ३१ डिसेंबरला शिर्डीकडे येत असताना तृप्ती देसाई यांनी सुपा पोलिसांनी अडविले होते. त्यावर त्यांनी हा बोर्ड हटविणारच असा दावा केला होता.

गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास मीनाक्षी रामचंद्र शिंदे रा. जात जि. सांगली. मनीषा राजाराम कुंजीर रा. वाघोली जि. प[पुणे व हर्शल मनोहर पाटील रा. कोपरठाणे यांनी गेट नंबर एक समोरील फलकावर काळ्या रंगाचे आईल फेकले. यावेळी संस्थांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना पकडून त्यांना शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील हर्षल पाटील यांनी आपण भूमाता बिग्रेडचा पदाधिकारी असल्याचे सांगितले.  

Web Title: Black thrown on the board of Sai Sansthan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here