Home अहमदनगर Car Burned: बीएमडब्ल्यू कार जळून खाक, चालक जखमी

Car Burned: बीएमडब्ल्यू कार जळून खाक, चालक जखमी

Nevasa BMW car burned on Road

नेवासा: शुक्रवारी पहाटे नेवासा राज्यामहा मार्गावर पाचेगाव फाटा येथे बर्निंग कारचा थरार झाला. बीएमडब्ल्यू कार संपूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. कारचालक किरकोळ भाजून जखमी झाला आहे.

पवन प्रकाश सदाशिवे रा. अरिहंत जवाहर कॉलनी, औरंगाबाद हे जखमी झाले आहेत. ते आपल्या परिवारासमवेत एम.एच. १४ बी. एक्स. ८७३१ या क्रमांकाच्या बीएमडब्ल्यू या कारातून शिर्डी येथून औरंगाबाद येथे घरी परतत असताना नेवासा तालुक्यातील पाचेगाव फाटा येथे आल्यानंतर कारने अचानक पेट घेतला. पवन सदाशिवे गाडी चालवीत असल्याने हे किरकोळ भाजले आहेत. त्यांच्यावर नेवासा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत कोणालाही जास्त प्रमाणात इजा झाली नाही मात्र लाखो रुपयांची कार पूर्णतः जळून खाक झाली आहे. कारने अचानक पेट कसा घेतला याबाबत चिंता व्यक्त होत आहे.    

Web Title: Nevasa BMW car burned on Road

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here