Home संगमनेर संगमनेर: अज्ञात कारच्या धडकेत दोन शेळ्या ठार तर सात जखमी  

संगमनेर: अज्ञात कारच्या धडकेत दोन शेळ्या ठार तर सात जखमी  

Sangamner Two goats killed and seven injured

संगमनेर | Sangamner: पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी शिवारातील १९ मैल येथे एका कार चालकाने शेळ्यांना धडक दिली.

या अपघातात दोन शेळ्या ठार तर सात जखमी झाल्या आहेत. यावेळी कार चालकाला थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो तेथून पसार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, खंदरमाळवाडी शिवारात गोकुळवाडी येथे सदाशिव बबन लेंडे हे शेतकरी वास्तव्यास आहेत. शुक्रवारी सदाशिव हे आपल्या शेळ्या चरण्यासाठी १९ मैल येथून पुणे नाशिक महामार्गाने जात होते. याच दरम्यान पाठीमागून भरधाव वेगात येणारी कार थेट शेळ्यांच्या कळपात घुसली. यावेळी सदाशिव लेंडे यांनी कार चालकाला पाठीमागून थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र तो कार चालक तेथून पसार झाला. यावेळी दोन शेळ्या मयत झाल्या आहेत तर सात शेळ्या ह्या गंभीर जखमी झाल्या.

या दरम्यान या घटनेची माहिती समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्या सर्व शेळ्यांना बाजूला घेण्यात आले आणि तेथे खासगी डॉक्टरला कळविण्यात आले. याप्रकरणी घारगाव पोलिसांना माहिती देण्यात आली.   

Web Title: Sangamner Two goats killed and seven injured

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here