Home अहमदनगर कोपरगावात दरोडा, मारहाण व सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लुटला

कोपरगावात दरोडा, मारहाण व सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल लुटला

Kopargaon Robbery three lakh theft

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यातील ओगदी येथे एका शेतकरी कुटुंबावर दरोडेखोरांनी घराचा दरवाजा दगडाने तोडून घरातील रोख रक्कम व दागिने असा ३ लाख १८ हजार रुपयांचा मुदेमाल लुटून नेला आहे. ही घटना शनिवारी पहाटे पावणे दोन वाजेच्या सुमारास घडली.

दरोडेखोरांनी कमलबाई लक्ष्मणबाई जोरवर या एकट्याच घरात असलेल्या यांना लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले आहे.

याप्रकरणी कमलबाई लक्ष्मणबाई जोरवर रा. ओगदी ता. कोपरगाव यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यात ओगदी येथे कमलबाई जोरवर आपल्या पतीसमवेत राहतात. त्यांचे पती शनिवारी रात्री शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना घराला बाहेरून कुलूप लावले होते. पत्नी आतमध्ये दार लावून झोपल्या होत्या. दरोडेखोरांनी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास कुलूप तोडले. त्यानंतर दार उघडत नसल्याने दार तोडण्यास सुरुवात केली. आत असलेल्या कमलबाई जोरजोराने ओरडू लागल्या. त्यांना दार उघडण्यास सांगितले. मात्र दार उघडण्यास कमलबाई यांनी विरोध केला. त्यावर दरोडेखोरांनी पाट्याने दरवाजा तोडत घरातील कपाटातील ५० हजार रुपये रोख रक्कम व  लाख ६८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले. यावेळी महिलेस लाकडी दांडक्याने मारहाण केली.  

Web Title: Kopargaon Robbery three lakh theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here