Home अहमदनगर बैल गाडीत चारा घेऊन जात असताना एकास तिघांनी नशेत लोखंडी गजाने मारहाण

बैल गाडीत चारा घेऊन जात असताना एकास तिघांनी नशेत लोखंडी गजाने मारहाण

Rahuri One by three, the drunk beat him with an iron rod

राहुरी | Rahuri: चारा घेऊन जात असताना बैल गाडीला थांबवून दारूच्या नशेत तिघा जणांनी प्रतिक लव्हे यास लोखंडी गज व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना २ ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात घडली.

प्रतिक लव्हे रा. गौतम नगर रेल्वे स्टेशन याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे. दिनांक २ ऑगस्ट रोजी १२ वाजेच्या दरम्यान प्रतिक लव्हे व त्याचा मित्र लखन म्हस्के हे अष्टविनायक शाळेशेजारील शेतामधून चारा आणण्यासाठी रेल्वे स्टेशन ते आरडगाव रोडने जात असताना रेल्वे बोगाद्याखाली आरोपी हे तेथे दारूचे नशेत उभे होते. त्यांनी प्रतिक लव्हे व त्याच्या मित्राला थांबविले. तेव्हा ते दोघे गाडीच्या खाली उतरून काय झाले याबाबत विचारले. तेव्हा आरोपींनी शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्यांनी व लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी आरडाओरडा केला असता ते गाडीवर पळून गेले. या मारहाणीत प्रतीकच्या गळ्यातील ओम पान व मोबाईल गहाळ झाले आहे.

लव्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सचिन चव्हाण रा. तांदुळवाडी, गोकुळ म्हसे, भारत पोपट म्हसे दोघे रा. कोंढवड या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास नाईक सुशांत दिवटे हे करीत आहे.

Web Title: Rahuri One by three, the drunk beat him with an iron rod

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here