Accident संगमनेर: पिकअप पलटी झाल्याने अपघात
संगमनेर | Accident: भरधाव वेगाने जाणाऱ्या पिकअप वरील वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे वाहन पलटी झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील रणखांब फाट्यावर काल दुपारी घडली. या अपघातात पिकअपचे मोठे नुकसान झाले आहे.
साकुर येथील बालाजी कृषी सेवा केंद्र यांच्या मालकीची ही पिकअप गाडी आहे. नाशिककडून साकुरकडे येत असताना रणखांब फाट्यानजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही पिकअप पलटी झाली. पिक अप गाडी ही भरधाव वेगात असल्याने नियंत्रित न करता आल्यामुळे हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बिरेवाडी येथील राजेंद्र कडणे यांनी अपघाताची माहिती घारगाव पोलीस स्टेशनला दिली.
Web Title: Sangamner Accident due to pickup overturning