Home क्राईम Theft: संगमनेर तालुक्यात महिलेची दुचाकी आणि मोबाईल चोरीस

Theft: संगमनेर तालुक्यात महिलेची दुचाकी आणि मोबाईल चोरीस

Sangamner Taluka Ladies bike and mobile theft

संगमनेर | Theft: संगमनेर तालुक्यातील जांबूत बुद्रुक गावांतर्गत असलेल्या ढोलदरा येथून चोरट्याने दुचाकी व मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. सोमवार दिनांक २ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जांबुत बुद्रुक गावांतर्गत असलेल्या ढोलदरा येथे मिना भाऊसाहेब घुले ही महिला राहात आहे. सोमवारी पहाटे अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी व मोबाईल चोरून पोबारा केला आहे मिना घुले यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.

या प्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १८६ / २०२१ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल दशरथ वायाळ हे करीत आहे.

Web Title: Sangamner Taluka Ladies bike and mobile theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here