Home क्राईम पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या

Rahuri Suicide of a police due to his wife's immoral relationship

राहुरी | Rahuri: श्रीरामपूर श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला गोपनीय विभागात काम केलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल रामदास हापसे वय ४० यांनी आत्महत्या केली होती. आता या आत्महत्यामागील माहिती उघडकीस आली आहे. एका पोलिसानेच पोलिसाचे जीबन संपविल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी मयत हेड कॉन्स्टेबल विशाल हापसे यांचे भाऊ देवेंद्र हापसे रा. देहरे ता. नगर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार देवेंद्र ने म्हंटले आहे की, त्याची भावजयी सोनाली विशाल हापसे व तिचा प्रियकर पोलीस नाईक विशाल खंडागळे यांच्यात अनैतिक संबंध असल्याने अडसर ठरत असलेल्या पती विशाल हापसे त्या दोघांनी एकमताने धमकी दिली. बायकोने सांगितले विशाल खंडागळे आणि माझे संबंध आहे तू आमच्यातून बाजूला हो नाहीतर तुला मारून टाकू असा दम विशाल हापसे याला दिल्याने त्याचबरोबर सोनाली हिने शिवीगाळ करून दमदाटी करून धमकी दिली. यामधून विशाल हापसे याने विष पिवून राहुरीत राहत्या घरी आपले जीवन संपविले.

याप्रकरणी पत्नी सोनाली विशाल हापसे मूळ रा. देहरे ता. राहुरी, पोलीस नाईक विशाल खंडागळे नेमणूक शिर्डी पोलीस ठाणे या दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

डीवायएसपी मिटके यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे हे अधिक तपास करीत आहेत. सोनाली विशाल हापसे हिस अटक केली आहे तर पोलीस कर्मचारी विशाल खंडागळे पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Web Title: Rahuri Suicide of a police due to his wife’s immoral relationship

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here