Home राहुरी उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून बेदम मारहाण

उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून बेदम मारहाण

Rahuri Breathless for borrowing money

राहुरी | Rahuri: उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून चार जणांनी एकास लाकडी दांडके व गजाने बेदम मारहाण तसेच शिवीगाळ केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली आहे.

याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, याप्रकरणातील फिर्यादी व व साक्षीदार हे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घरासमोर उभे होते. त्यादरम्यान आरोपी संकेत दिनेश पवार, ईश्वर नामदेव टिळेकर, महेश दिनेश पवार, आकाश बापूसाहेब शिरसाट सर्व रा. कोल्हार खुर्द हे आले आणि उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून लोखंडी गजाने, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी चंद्रकांत भाऊसाहेब जाधव यांच्या फिर्यादिवारुंरःरी पोलीस ठाण्यात चार वरील चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास श्रीरामपूर उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके हे करीत आहे.   

Web Title: Rahuri Breathless for borrowing money

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here