Home अकोले अकोले तालुक्यात आज २७ करोना बाधितांची वाढ

अकोले तालुक्यात आज २७ करोना बाधितांची वाढ

Akole taluka 27 coronavirus infected Today 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज खासगी अहवालात सात तर अँटीजेन चाचणीत वीस जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या २८ शतकाच्या पार २८०३ इतकी झाली आहे.

आज खासगी प्राप्त अहवालात नवलेवाडी येथे ४४ वर्षीय महिला, २१ वर्षीय तरुण, धुमाळवाडी येथे ३३ वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथे ३० वर्षीय महिला, ३४ वर्षीय पुरुष, गावठाण कोतूळ येथे ५० वर्षीय पुरुष, अकोले येथे ७२ वर्षीय महिला असे बाधित आढळून आले आहेत.

अँटीजेन चाचणीत २० जण यामध्ये  कचेरी रोड अकोले येथे १८ वर्षीय तरुण, शेलद येथे ४५ वर्षीय महिला, नवलेवाडी येथे ५० वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ४५ वर्षीय महिला, पाटील गल्ली अकोले ४५ वर्षीय पुरुष, अकोले येथे २२ वर्षीय तरुणी, गणोरे येथे ६ वर्षीय महिला, पैठण येथे २४ वर्षीय तरुण, अकोले येथे २९ वर्षीय महिला, २ वर्षीय बालक, सावरगाव पाट येथे ४० व ६६ वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे २३ वर्षीय पुरुष, मेहंदुरी ५५ वर्षीय महिला, पिंपळगाव नाकविंदा येथे ५० वर्षीय पुरुष, पिंपळदरी येथे ४५,६१ वर्षीय महिला, २० व २४ वर्षीय पुरुष, कळंब येथे ६० वर्षीय महिला असे २७ जण बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Akole taluka 27 coronavirus infected Today 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here