Home अकोले गाठी ऋणानुबंधाच्या पुस्तक म्हणजे  बहुजन समाजाचा भारतीय इतिहासात प्रवेश झाल्याची साक्ष: डॉ....

गाठी ऋणानुबंधाच्या पुस्तक म्हणजे  बहुजन समाजाचा भारतीय इतिहासात प्रवेश झाल्याची साक्ष: डॉ. रावसाहेब कसबे

Bahujan Samaj History
ष्ठ नेते मधुकरराव नवले लिखित ‘गाठी ऋणानुबंधाच्या’ या पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्या प्रसंगी डॉ रावसाहेब कसबे,आ.डॉ.सुधीर तांबे,ऍड. संघराज रुपवते, इंद्रभान डांगे,सुरेशराव कोते,दशरथ सावंत,अशोकराव भांगरे, बी जे देशमुख आदी मान्यवर ( छाया-दिनेश नाईकवाडी, अकोले)

अकोले: इतिहास हा कोणा एका व्यक्तीचा नसतो. तो सर्वसामान्यांनी निर्माण केलेला असतो. यापूर्वी  अनेक ‘चुकीच्या’ माणसांचे इतिहास लिहिले गेले. मधुभाऊंनी लिहिलेले पुस्तक म्हणजे बहुजन समाजाचे इतिहासात पदार्पण झाल्याची साक्ष आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ रावसाहेब कसबे यांनी  मिनर्व्हा प्रतिष्ठान च्या वतीने नाते ऋणानुबंधाचे या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.संघराज रुपवते होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, साध्वी प्रितीसुधाजी स्कूलचे संस्थापक   इंद्रभान डांगे, शेतकरी नेते दशरथ सावंत , लिज्जत पापड चे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते,ज्येष्ठ नेते  अशोकराव भांगरे  , बी.जे. देशमुख, नगराध्यक्षा संगिताताई शेटे, मिनर्व्हा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र खांडगे,  सचिव डॉ जयश्री देशमुख, डॉ.शिवाजीराव  बंगाळ,प्रा डॉ मिलिंद कसबे, मिलिंद गायकवाड, डॉ सोमनाथ मुटकुळे, सूर्यकांत शिंदे, ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, विठ्ठलराव चासकर, मिनानाथ पांडे,रमेश जगताप, कचरू पा शेटे, भानुदास तिकांडे,सुरेश खांडगे,अरुण रुपवते, संपतराव नाईकवाडी, सुरेश गडाख,मंदाताई नवले,आरिफ तांबोळी, मदन पथवे,मधुकर सोनवणे,पाटीलबा  सावंत, कॉ आर डी चौधरी,  हभप दीपक महाराज  देशमुख,विक्रम नवले,राधिका नवले,यांचेसह विविध क्षेत्रातील  मान्यवर  उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते ‘मिनर्व्हा प्रतिष्ठान’ च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. डॉ जयश्री देशमुख यांनी मिनर्व्हा प्रतिष्ठानच्या उद्दिष्टांची माहिती दिली. ‘मिनर्व्हा’ ही  ‘सरस्वती’ प्रमाणे  विद्येची रोमन देवता आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. मधुकरराव नवले यांनी पुस्तकाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत उपस्थितांचे स्वागत केले.शेतीमध्ये रमत असताना शेतकर्‍यांचा कार्यकर्ता म्हणून पुढे आलो.   आयुष्यात वाटचाल करत असताना अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी  ऋणानुबंधाने   जोडलो गेलो असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या व उपस्थितांचे स्वागत केले.

मिनर्व्हा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य रमेशचंद्र खांडगे 

मिनर्व्हा’ ही  ‘सरस्वती’ प्रमाणे  विद्येची रोमन देवता आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ जिवंत ठेवणार असल्याचे त्यांनी नमूद केले. आ.डॉ सुधीर तांबे   यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना  मधुकरराव नवले यांचे कौतुक करत ज्या लोकांनी इतिहास गेले त्यांनी जगावर राज्य केल्याचे नमूद केले व मधुभाऊंनी त्यांच्या सिध्दहस्त लेखणीतून लिहित जावे असे आवाहन केले.  प्राचार्य इंद्रभान डांगे यांनी    मधु भाऊ हे ‘सिद्धपुरुष’ असल्याचे नमूद केले. शेतकरी नेते दशरथ सावंत यांनी  मधुकरराव नवले यांनी पुस्तकामध्ये ओथंबलेल्या भावना लिखित स्वरूपात दिल्यामुळे त्याला पावित्र्य आल्याचे म्हटले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संघराज रूपवते यांनी अभिनव महाराष्ट्राचे मानबिंदू आहे . ‘भेटीत तुष्टता मोठी’ त्याप्रमाणे मधुभाऊंनी   लेखणीतून त्यांच्याशी ऋणानुबंध असलेल्या व्यक्तींचे वर्णन केलेले आहे असे म्हटले. यावेळी अशोकराव भांगरे बी जे देशमुख यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले . त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. पुस्तकाचे मुद्रक सुजाता ऑफसेट चे सुजित नवले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अमोल वैद्य व प्राजक्ता सोलापुरे यांनी केले  तर आभार विक्रम नवले यांनी मानले.

Web Title: Book written by Madhubhau is the debut of Bahujan Samaj in history 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here