Home महाराष्ट्र यंदाचा मान्सून कसा असणार! शेतकऱ्यांसाठी महत्वाचे वृत्त

यंदाचा मान्सून कसा असणार! शेतकऱ्यांसाठी महत्वाचे वृत्त

Rain weather alert 2022

Rain weather alert 2022 | नवी दिल्ली: शेतकऱ्यांसाठी यंदाची महत्वाची बातमी समोर आली आहे. स्कायमेट एजन्सीने यंदाच्या मान्सूनबाबत अंदाज वर्तविण्यात आला आहे.

यावर्षी मान्सून सामान्यच राहणार असल्याची माहिती स्कायमेट एजन्सीने वर्तविला आहे. या अंदाजामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.  

खासगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेट एजन्सीने 2022 साठी प्राथमिक मान्सून अंदाज सांगितला आहे.  त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार असून 2022 मध्ये मान्सून सरासरीच्या 97 ते 104 टक्के राहण्याचा अंदाज या एजन्सीने व्यक्त केला आहे.

सुरुवातीच्या काळात मान्सूनची स्थिती चांगली असेल. भरपूर पाऊस या काळात पडेल. हा हंगामी काळ शेतकऱ्यांसाठी अनुकूल राहणार आहे. याबाबत स्कायमेट एजन्सीचे उपाध्यक्ष आणि मुख्य हवामानशास्त्रज्ञ डॉ. पलावत यांनी माहिती दिली आहे.

त्यांच्या माहितीनुसार पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडेल. ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मध्यात पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. 2021 मध्ये देखील मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता. यावर्षी देखील मान्सून सामान्य राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

Web Title: Rain weather alert 2022

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here