Home Accident News अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Ahmednagar Accident Two-wheeler killed in collision with unknown vehicle

Ahmednagar Accident | अहमदनगर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना जामखेड रोडवरील आर्मीचे बंद थेटरजवळ घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील साकिब हुसेन ऊर्फ बबलु सय्यद (वय 26 रा. भातोडी पारगाव ता. नगर) याचा मृत्यू झाला.

जामखेड रोडवरील आर्मीचे बंद थेटरजवळ हा अपघात घडला. याबाबत मयत साकिबचा भाऊ शकील हुसेन ऊर्फ बबलु सय्यद (वय 29) यांनी फिर्याद दिली आहे. साकिब हुसेन ऊर्फ बबलु सय्यद हा त्याच्याकडील दुचाकीवरून जामखेड रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या वाहन चालकाने धडक दिली. या धडकेत जखमी झालेल्या साकिबचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नागरगोजे करीत आहेत.

Web Title: Ahmednagar Accident Two-wheeler killed in collision with unknown vehicle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here