Home संगमनेर ५० वर्षांनंतरही शिवबाराजे प्रत्येकाच्या हृदयात.!-प्रा.सतिष उखर्डे

५० वर्षांनंतरही शिवबाराजे प्रत्येकाच्या हृदयात.!-प्रा.सतिष उखर्डे

Sangamner Shiv Jayanti Speech 2022 Satish Ukarade

संगमनेर | Shiv Jayanti Speech 2022: शिवजयंती निमित्त देवगाव ता.संगमनेर येथील व्याख्यान                

आज तरुण पिढीला शिवरायांच्या आदर्श विचारांची गरज आहे. राजे शिवबांनी जसे संघर्ष करत मेहनतीतून हे ‘रयतेचे स्वराज्य’ उभे केले,म्हणून ३५० वर्षांनंतरही शिवबा राजे प्रत्येकाच्या हृदयात आहेत..!त्यांचा आदर्श आपल्या जीवनात तरुण पिढीने घ्यावा, असे प्रतिपादन प्रा.सतिष उखर्डे यांनी देवगाव ता. संगमनेर येथे शिवजयंती निमित्त व्याख्यानात केले.

पुढे प्रा.उखर्डे म्हणाले की, शिवबाराजेंनी शेतकरी जगवला,शिवकाळात एकाही शेतकऱ्याने आत्महत्त्या केली नाही.कोरोनाकाळात तर अनेक उद्योग-व्यवसायांना टाळे लागले, परंतू माझ्या शेतकरी बांधवांमुळे कोणाच्याही चुलीला टाळे लागले नाही,शेतकऱ्यांवरच संपूर्ण जग आधारलेले आहे.कोरोनाकाळातही शिवचरित्र आम्हाला प्रेरणादायी ठरते..!

 माँसाहेब जिजाऊँनी शिवबांना संस्कारांचे धड़े देऊन घडविले,ती जबाबदारी आताच्या आमच्या आईवर येऊन ठेपली आहे. ते ‘संस्कार’ आपल्या मुलांना मिळाले तर,शिवाजी-संभाजी महाराज याच महाराष्ट्राच्या मातीवर पुन्हा घड़तील.! विद्यार्थ्यानी कुठल्याही चांगल्या क्षेत्रात ‘टॉप’ ला जाणे म्हणजे शिवाजी महाराज होणे,परंतु ते अभ्यास आणि संघर्षाशिवाय शक्य नाही.! विद्यार्थ्यानी स्वप्ने मोठी बघावी,उठून त्याचा पाठलाग करावा आणि आपले अचूक ध्येय गाठावे.मोबाईल सारखी व्यसने आता घातक ठरू लागली आहे,तेव्हा कुठलचं व्यसन करू नये,नीतीने वागावे आणि आपल्या आई-वडिलांची स्वप्ने साकारावीत, तरच आपण या जिजाऊँ-शिवबांच्या स्वराज्याला जागलो….त्यांचा आदर्श घेतला असं म्हणता येईल…!

शिवजन्मोत्सवानिमित्त डॉ.अण्णासाहेब शिंदे विद्यालय,जिल्हा परिषद प्राथ.शाळा व शिवजयंती उत्सव समिती,देवगाव ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली, शिवमहाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते…या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनरावजी शिंदे हे होते,तसेच व्यासपीठावर सरपंच अर्चनाताई लामखडे, रावसाहेब कोटकर, प्रकाश कोटकर, प्रविण शिंदे, दिगंबर लामखडे,पोलीस पाटील विजय पावसे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सर्व आजी-माजी सैनिक,शिक्षकवृंद,विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कोटकर यांनी केले आणि अशोक शेलार यांनी आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.

Web Title: Sangamner Shiv Jayanti Speech 2022 Satish Ukarade

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here