Home अकोले राजूर: गावात दादागिरी, दहशत करणाऱ्यांना का? धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्यांना ...

राजूर: गावात दादागिरी, दहशत करणाऱ्यांना का? धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्यांना निवडून देणार का?

Rajur Grampanchayat Election: लहामटे : राजूर विकास मंडळ प्रचार शुभारंभ, वैभव पिचड : ग्रामविकास मंडळाचा प्रचार प्रारंभ.

Rajur Grampanchayat Election Mandal promotion started

राजूर: राजूर गावात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मंडळाचा प्रचार प्रारंभ करताना दोन्ही मंडळाच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका केली आहे. आता राजूरकर कोणाला कौल देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

राजूर गावात दादागिरी आणि दहशत निर्माण करणाऱ्यांना साथ देणार की गाव विकासाची बांधिलकी जपणाऱ्या विकास आघाडीला निवडून देणार?, असा सवाल आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राजूर विकास होते. मंडळाच्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना व्यक्त केला.

राजूर येथील सर्वोदय विभागातील महादेव मंदिरात गुरुवारी आमदार लहामटे यांच्या हस्ते राजूर विकास मंडळाच्या प्रचाराचा श्रीफळ वाढवन होते.

शुभारंभ करण्यात आला. यावेळी या मंडळाचे सरपंच पदाचे उमेदवार पुष्पा दत्तात्रय निगळे, साथी विनय सावंत, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब कवडे, रामदास पवार, दत्तात्रय निगळे, राजेंद्र चोथवे, गौरव माळवे, ओंकार राजूर नवाळी, लक्ष्मण जाधव, हरिभाऊ एलमामे, भास्कर पवार, शुभम एलमामे व इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित

यावेळी विनय सावंत, बाळासाहेब देशमुख, बाळासाहेब कवडे, रामदास पवार, दत्तात्रय निगळे, राजेंद्र चोथवे. गौरव माळवे, ओंकार नवाळी, लक्ष्मण जाधव, हरिभाऊ एलमामे, भास्कर पवार, शुभम एलमामे आदी उपस्थित

गोरगरिबांचे धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्यांना निवडून देणार का?

आदिवासी, उपेक्षित, दीनदलित गरिबांचे धान्य काळ्या बाजारात विकणाऱ्या लोकांना साथ निवडून देणार की, गाव बांधिलकीच्या माध्यमातून ग्रामविकास करणाऱ्या ग्रामविकास मंडळाला? असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास मंडळाच्या प्रचार प्रारंभ कार्यक्रमात बोलताना केला.

गुरुवारी सकाळी श्री दत्तमंदिरात ग्रामविकास मंडळाचा प्रारंभ १०१ नारळ वाढवून करण्यात आला. राजूर गावातील रस्ते व इतर विकासकामे माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार पिचड, हेमलता पिचड यांनी केले असल्याचे भास्कर एलमामे यांनी सांगितले. यावेळी उमेदवार शोभा देशमुख, गोकुळ कानकाटे, आयुब तांबोळी, शमशुद्दीन तांबोळी, ललित चोथवे, राम चोथवे, बालचंद भडांगे, भाऊसाहेब आल्हाट, काळू मोहंडुळे, यादव देशमुख, किशोर देणाऱ्यांना देशमुख, नामदेव देशमुख, अरविंद देशमुख व मोठ्या संख्येने महिला मतदार, ग्रामस्थ उपस्थित होते. संतोष बनसोडे, भास्कर एलमामे, काशीनाथ भडांगे, नितीन काळे, उपसभापती दत्ता देशमुख, बाळासाहेब लहामगे यांनी मनोगत केले

Web Title: Rajur Grampanchayat Election Mandal promotion started

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here