Home Accident News Accident: खड्ड्यांमुळे अपघात, कंटेनरच्या चाकाखाली महिला ठार

Accident: खड्ड्यांमुळे अपघात, कंटेनरच्या चाकाखाली महिला ठार

Ahmednagar Accident:  नगर-मनमाड रस्त्यातील खड्याने घेतला महिलेचा बळी.

Accident due to potholes, woman killed under container wheel

राहुरी : नगर-मनमाड राज्य महामार्गाची अत्यंत दूरवस्था झाली आहे. गुरुवार, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान मीराबाई तागड या खड्ड्यांमुळे मोटरसायकलवरून पडल्या आणि पाठीमागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली येऊन जागेवर ठार झाल्या. त्यांचे पती गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

राहुरी तालुक्यातील डिग्रसचे रहिवासी असलेले राधाकृष्ण तागड व त्यांची पत्नी मीराबाई तागड हे सकाळी सातच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवरून डिग्रस येथून राहुरीकडे येत होते. नगर- मनमाड राज्य महामार्गावर डिग्रस फाटा येथे दुचाकी रस्त्यातील खड्ड्यात आदळली. तेव्हा मीराबाई तागड रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी नगरहून राहुरीच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरच्या चाकाखाली येऊन ३८ वर्षीय मीराबाई यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती राधाकृष्ण तागड गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.

चार दिवसांपूर्वीच राहुरी येथील अजय बोरूडे या २८ वर्षीय तरुणाचा रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात होऊन तो मयत झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा नगर-मनमाड रस्त्याने मीराबाई तागड या महिलेचा बळी गेला. मयत मीराबाई तागड यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा, नवरा, सासू असा परिवार आहे.

Web Title: Accident due to potholes, woman killed under container wheel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here