Home क्राईम मुलांना खरेदी करून वेठबिगारी, मुलीचा मृत्यू, संगमनेरातील एकास अटक

मुलांना खरेदी करून वेठबिगारी, मुलीचा मृत्यू, संगमनेरातील एकास अटक

Sangamner Arrested: सहा ते पंधरा वयोगटातील चिमुकल्यांना अवघ्या पाच हजारापर्यंत खरेदी करून त्यांना वेठबिगार बनविले जात आहे. 

Buying children and molesting, girl's death, one arrested

संगमनेर: अत्तापर्यंत अंधश्रद्धेतून बळी देण्यासाठी किंवा भिक मागण्यासाठी लहान मुलांना पळविणे किंवा खरेदी केली जात होती. मात्र आता थेट मेंढ्या पोसण्यासाठी थेट सहा ते पंधरा वयोगटातील चिमुकल्यांना अवघ्या पाच हजारापर्यंत खरेदी करून त्यांना वेठबिगार बनविले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात अशाच पद्धतीने विक्री करण्यात आलेल्या मुलीचा मारहाणीत मृत्यू झाल्याने या मेंढर बाजाराचे पितळ उघड पडले आहे. याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील विकास सिताराम कुंदनर याच्यावर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर याप्रकरणात संगमनेर व अकोले तालुक्यातील अनेकजण गुंतले असल्याचे पुढे आले अनेकजण गुंतले असल्याचे पुढे आले आहे. या प्रकराने समाजमन हेलावले असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गौरी अगविले (वय १०) या चिमुरडीला तीन वर्षांपुर्वी विकास कुदनर (शिंदोडी) याने मेंढया चारण्यासाठी अवघ्या तीन हजार रूपयात विकत घेतले होते. कुदनर यांने गौरीला अनेकवेळा मारहाण केली. दरम्यान २७ ऑगस्टला तीला पुन्हा बेदम मारहाण करून तीला गळफास देऊन तीला तीच्या पालकांच्या झोपडीसमोर फेकून दिले. सात दिवसांच्या उपचारानंतर गौरीचा मृत्यू झाला.

याप्रकरणी श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेत याचा तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली. अशा प्रकारे तीस मुलांची वेठबिगार म्हणून विक्री करण्यात आल्याचे समोर आले. यातील सहा मुले सापडली असून २४ मुले बेपत्ता आहे. याप्रकरणी घोटी, अकोले, घुलेवाडी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. याप्रकरानंतर कुदनर याला पोलीसांनी अटक केली आहे. यात रावा खताळ (ता. अकोले) याने तेरा वर्षांच्या पिडीतेला खरेदी केले. या पिडीतेला तीच्या वडीलांनी अवघ्या पाच हजार रूपयात खताळ याला विकले होते. खताळ याने तिच्याकडून मेंढ्या संभाळून घेतल्या. कांतीलाल (ता. पारनेर) याने १३ वर्षीय पिडीतेसह तीच्या भावाला खरेदी केले होते. काम केले नाही तर काठीने मारहाण करायचा. आजारी असतांना उपचारही करत नव्हात. प्रकाश पुणेकर (संगमनेर) याने दहा वर्षीय पिडीतेला खरेदी करून मेंढ्यांमागे पाठवायचा, शिवीगाळ करायचा, रात्री-अपरात्री उठवयाचा व मेंढ्यांकडे लक्ष द्यायला लावयचा. रामा पोकळे (संगमनेर) याने १५ वर्षीय पिडीताला विकत घेतले होते. केवळ खारी – बटर खाऊन दिवस काढायला लावायचा. प्रसंगी मारहाण देखील करायचा. यांचा सहभाग असून त्यांनी या मुलांना खरेदी करून वेठबिगार बनविले आहे. या प्रकरणात मोठी साखळी असून पोलीस याचा कसून शोध घेत आहे.

Web Title: Buying children and molesting, girl’s death, one arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here