तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन शालेय मुलांचा बुडून मृत्यू
Jalgaon Drowned: तीन शालेय मित्र पोहोण्यासाठी गेले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू.
जळगाव: जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील धारगीर शिवारात असलेल्या तलावात तीन शालेय मित्र पोहोण्यासाठी गेले असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे तर एक जण बचावला आहे. ही घटना आज दुपारी घडली. गावात ही बातमी समजताच कुटुंबाने आक्रोश केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील धारागिर शिवारात असलेल्या तलावात निलेश राजेंद्र मिस्त्री (वय १७ ), सूर्यवंशी शिवाजी पाटील (वय १५) व जय जालिंदर सोनवणे हे पोहण्यासाठी गेले होते. हे तिघे मित्र शिरसोली येथील भोलानाथ नगरातील रहिवाशी पोहत असताना निलेश व सुर्यवंशी हे तलावाच्या मधोमध गेले. यात ते बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर या घटनेत नववीत शिक्षण घेणारा जय सोनवणे हा बचावला आहे. दोघा शाळकरी मुलांचे मृतदेह एमआयडीसीच्या समाधान टाकळे, शुद्धधन ढवळे दोन कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने काढले असून या ठिकाणी पोलीस पाटील श्रीकृष्ण पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांनी गर्दी केली होती. दरम्यान दोन्ही मुलांचे मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.
घटनास्थळी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचारी आणि पोलीस पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेऊन विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल या तिघांनी त्या दोन मृत मुलांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
Web Title: Two school children who went swimming in the lake drowned