Home अकोले राजूर: जलतरण स्पर्धांमध्ये सर्वोदय विदया मंदिर विदयालयाचे यश

राजूर: जलतरण स्पर्धांमध्ये सर्वोदय विदया मंदिर विदयालयाचे यश

जलतरण मध्ये सर्वोदय विदया मंदिर विदयालयाचे यश.

मुलांमध्ये यश मैड तर मुलींमध्ये संस्कृती हंगेकर प्रथम.

पिंपळगाव नाकविंदा / प्रतिनिधी –जीवन जगत असताना मनुष्य हा विविध कला गुण आत्मसात करत असतो. या विविध कला गुणांमध्ये पोहण्याची कला देखील आत्मसात करणे तितकेच महत्वाचे असते. याच अनुशंगाने वाडिया पार्क क्रिडा संकुल अहमदनगर येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धांचे आयोजन केले होते.
या जलतरण स्पर्धांमध्ये गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजुर (ता. अकोले ) या विद्यालयाने चांगलेच यश संपादन केले आहे.
यामध्ये १४ वर्षाखालील मुलांमध्ये राघव धराडे याने २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये तृतीय तर ५० मीटर मध्ये चतुर्थ क्रमांक तर मुलींमध्ये यशश्री धराडे हिने १०० मिटर फ्री स्टाईल मध्ये द्वितीय क्रमांक संपादन केला आहे.
तसेच १७ वर्षाखालील मुलांमध्ये उद्धव लहामगे याने १०० मीटर व ५० मिटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे १९ वर्षाखालील मुलांमध्ये यश मैड याने ५०मीटर, १०० मीटर व २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.तर मुलींमध्ये संस्कृती हंगेकर हिने ५० मीटर बॅक स्ट्रोक तसेच १०० मीटर फ्री स्टाईल मध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या सर्व जलतरणपटूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
या यशस्वी खेळाडूंना क्रिडा शिक्षक प्रा.विनोद तारू, भारत भोसले, भाऊसाहेब बनकर, जालिंदर आरोटे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्ल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त प्रकाश शहा तसेच सर्व संचालक मंडळ त्याचप्रमाणे प्राचार्य मनोहर लेंडे, उपप्राचार्य लहानु परबत, प्राचार्य अंतुराम सावंत, मुख्याध्यापक के.एल.नवले, माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here