अकोले: भोजापूर धरण ओव्हरफ्लो
अकोले तालुक्यात सुरु असलेल्या संतधार पावसामुळे भोजापूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा आल्याने आज सकाळी ११:३० वाजता ३६१ दलघफु क्षमतेने भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे म्हाळुंगी नदीपात्रात ३५० क्यूसेकने ओव्हरफ्लो सुरु झाला आहे.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
तसेच भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात काही दिवसापासून धुवाधार पाउस कोसळत होता. भंडारदरा धरण अगोदरच ओव्हरफ्लो असल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग निळवंडे धरणात सोडण्यात येत होता त्यामुळे निळवंडे धरणही भरले होते. पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने बुधवारी निळवंडे धरणातून पहिल्यांदाच १४२०० क्यूसेकने पाणी नदीपात्रात सोडले गेल्याने प्रवरा नदीला मोठा पूर आला त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. आज मात्र पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर काहीसा मंदावला असून निळवंडे धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये मोठी घट करण्यात आल्याने प्रवरा नदी आता नियंत्रणात वाहू लागली आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.