अहमदनगर महानगरपालिका निवडणुक
१७ प्रभागअन् ६८ नगरसेवकसंख्या : खुला-40,
इतरमागास –१८ ,एससी– ८, एसटी- १
अहमदगर /प्रतिनिधी :अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.२४) रोजी काढण्यात येणार आहे. मनपाच्या निवडणुकीसाठी एकुण १७ प्रभाग पाडण्यात आले असुन, प्रत्येक प्रभागात ४ सभासद संख्या याप्रमाणे एकुण ६८ नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. त्यात अंदाजे खुल्या प्रभावर्गासाठी – ४०, इतरमागासप्रवर्ग – १९, एससी – ८ आणिएस टी-१ असे आरक्षण असणार आहे. त्यात महिलांसाठीएकुण ३४ जागा आरक्षित असण्याचे शक्याता वर्तले आहे.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनपा प्रशासनाकडुन हालचालींना वेग आला आहे.निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याची कार्यवाही प्रशासकीय पातळीवर सुरु झाली आहे.तर(दि.२४ )ऑगस्टला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ही निवडणुक चार सदस्यीय पध्दतीने होणार असल्याने एकूण १७ प्रभाग पाडण्यात येतील. त्यामुळे सदस्य संख्या ६८ होणारआहे.या निवडणुकीसाठी सन २०११ ची लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. मनपा निवडणुकीसाठी ७ ऑगस्टला प्रभागरचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आलेला आहे.एका प्रभागात सुमारे १८-२० हजार एवढी मतदारसंख्या राहण्याची शक्यता आहे.
You May Also Like: Shraddha Kapoor Upcoming Movies
या निवडणुकिसाठी ६८ प्राभागात अंदाजे खुल्या प्रवार्गासाठी ४० जागा, इतरमागासप्रवर्ग (ओबीसी) १९ जागा, अनुसुचित जातीप्रवर्गासाठी ८ जागा, तर अनुसुचितजमाती प्रवर्गासाठी १ जागा कायम करण्याचे शक्याता आहे. तसेच ६८ जागांपैकी ५०% जागा म्हणजेच ३४ सदस्यसंख्या महिलांसाठी राखीव असणार आहे. (२७) ऑगस्टला प्रभागरचना जाहिर करण्यात असुन त्यावर (५) सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदविण्याची मुदत ठेवण्यात आले आहे.एकुणच ऑगस्ट अखेरपर्यंत प्रभागरचना व आरक्षित जागांचा प्रश्न निकाली लागणार असल्याने इच्छुक उमेदवारांची चाचपणी, ताकदवान उमेदवार निवडीकडे सर्वच पक्षांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ही निवडणुक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता असुन, या निवडणुकित कोण बाजी मारील, याकडे सर्वांचे लक्ष लागले असुन, चौकाचौकांत निवडणुकिचे वारे वाहु लागले आहे.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.