Home अहमदनगर बांधकाम व्यावसायिकास ‍अनधिकृत वाळुसाठयाप्रकरणी ४७ लाखांचा दंड

बांधकाम व्यावसायिकास ‍अनधिकृत वाळुसाठयाप्रकरणी ४७ लाखांचा दंड

बांधकाम व्यावसायिकास ‍अनधिकृत वाळुसाठयाप्रकरणी ४७ लाखांचा दंड

अहमदनगर/ प्रतिनिधी (ahmednagar): अहमदनगर शहरातील नालेगाव येथील महावीर होम्स या नावाने काम सुरु असलेल्या बांधकाम करणाऱ्या व्यावसायिकास अनधिकृत १८४.५० ब्रास वाळुचा साठा केल्याप्रकरणी संबधित व्यावसायिकास नगर तहसिलदारांनी ४६ लाखा ७३ हजार ६०० रुपयांचा दंड केला आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

याबाबत सविस्तर असे की, नालेगावात सर्व्हे नं ७६/२ मध्ये महावीर होम्स नावाने बांधकाम सुरु होते. या कामासाठी तब्बल १८४.५० ब्रास वाळुसाठा केलेला आढळुन आला होता. या साठयाबाबत नालेगावाच्या तलाठयाने ११/१०/२०१७ रोजी पंचनामा करुन तसे तहसील कार्यालयास कळवले होते. तत्कालीन नगर तहसीलदारांनी याबाबत नोटीस देवून खुलासा करण्याचे कळवले होते. त्या अनुषंगाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाने दि. १९/२२/*२०१७ रोजी खुलासा सादर करुन ही नोटीस मान्य नसुन, हा वाळुसाठा बांधकामासाठी केला असुन ती सर्व वाळु खरेदी केली आहे. तसेच त्याबाबतच्या खरेदी पावत्या आपल्याकडे असल्याचे नमुद केले होते. तसेच पावत्यांचा झेरॉक्सप्रती या सोबत जोडल्या होत्या. दरम्यान तत्कालीन तहसीलदारांची बदली झाली व सदरचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने पुन्हा संधी देणे नैसर्गिक न्यायास अनुसरुन दि. ३/७/२०८ रोजी सदराच्या वाळुसाठयबाबतच्या मुळ पावत्या व म्हणने मागविले होते. त्यानंतर महावीर होम्स नावाच्या संबधित व्यावसायिकाने  दि. ७/७/२०१८ रोजी सदरचा वाळुसाठा अधिकृत पावत्या घेवुन खरेदी केल्याचे म्हटले होते.

You May Also LikeShraddha Kapoor Upcoming Movies 

परंतु त्याबाबतच्या मुळ पावत्या त्यांनी कार्यालयास सादर केल्या नाहीत. त्यामुळे परत दि. २५/७/२०१८ रोजी मुळ पावत्या मागितल्या मात्र त्या सादर केल्या नाहीत. तसेच त्या ज्या झेरॉक्स पावत्या होत्या. त्यावर कोठेही महावीर होम्स नावाचा उल्लेख नव्हता.  तसेच खरेदीदाराचे नाव पत्याऐवजी मोघमपणे अहमदनगर, पुणे मुंबई किंवा दुसऱ्या व्यक्तिचे नाव नमुद केला आहे. त्यामुळे दि. १३/८/२०१८ रोजी संबंधित व्यावसायिकाने वाळु अधिकृत असल्याचे पुरावे सादर केले नाही. त्यामुळे नगर तहसिलदाराने संबंधित व्यावसायिकाविषयी अनधिकृत वाळु ठेवल्यामुळे ४६ लाख ७३ हजार ६०० रुपयांचा दंडात्मक कार्यावाही /आदेश पारित केल्याचे प्रसिध्द पत्रकात नमुद केले आहे.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here