Home अकोले अकोले: पिकअप-मोटारसायकल अपघातात एक ठार : एक गंभीर

अकोले: पिकअप-मोटारसायकल अपघातात एक ठार : एक गंभीर

पिकअप-मोटारसायकल अपघातात एक ठार : एक गंभीर

अकोले/ प्रतिनिधी: तालुक्यातील बाभुळवंडी –पिंपरकणे रस्त्यावर पिकअप जीप व मोटरसायकल यामध्ये झालेल्या अपघातमध्ये एकजण ठार, तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात नंदू पुंजीराम  मंडलिक (वय५५, रा. उंचखडक बुद्रुक, ता. अकोले) हे ठार झाले असुन ते अगस्ती कारखाना येथील कर्मचारी आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी सांगितले की, बाभुळवंडी –पिंपरकणे रस्त्यावरबाभुळवंडीशिवरात पिकअप जीपने (क्र.एमएच ४२ एम ८२३ ) समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यामध्ये नंदू पुंजीराम मंडलिक (वय ५५, रा. उंचखडक बुद्रुक, ता. अकोले) यांचे जागीच निधन झाले, तर दिलीप पांडुरंग जाधव (रा. आंबड, ता. अकोले) हे गंभीर जखमी झाले. जाधव यांना पुढील उपचारासाठी संगमनेर येथे हलवण्यात आले. यावेळी पिकअप चालकानेच या दोघांनाही आपल्या गाडीत टाकुन अकोल्याचा ग्रामीण रुग्णालयात आणले. त्यानंतर तो पिकअप सह अकोले ‍पुलिस ठाण्यात दाखल झाला. ‍पोलिसांनी चालक सोमनाथ घारेपडे (रा. लांडगाव, ता. अकोले) याचे विरुध्द निष्काळजीपणे वेगाने वाहन चालवून मृत्युस कारणीभुत असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातातील हे दोघेहि अगस्ती साखर कारखान्यातील कर्मचारी आहेत. मयत नंदू मंडलिक हे कारखान्याच्या टाइम ऑफिसमध्ये  क्लार्क होते. त्यांचा पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. अपघाताचे वृत्त्‍ समजताच अगस्ती कारखानाचे संचालक मिनानाथ पांडे, अशोकराव देशमुख, बाळासाहेब ताजणे, प्रताप देशमुख, संतु भरीतकर, राहुल देशमुख, आबासाहेब मंडलिक, भाऊ खरात, आदींनी रुग्णालयात धाव घेतली.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here