Home संगमनेर संगमनेरात दोन गटात हाणामारी : १७ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेरात दोन गटात हाणामारी : १७ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेरात दोन गटात हाणामारी : १७ जणांवर गुन्हा दाखला

संगमनेर:घरगुती कारणावरुन दोन गटात तुफान हाणमारी झाल्याची घटना काल बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहारातील नाईकवाडीपुरा येथे घडली. या प्रकरणी परस्पर फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी १७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

You May Also LikeDeepika Padukone Ranveer Singh Marriage Date

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, याप्रकरणी फिर्यादी नदीम हुसेन शेख (रा. नाईकवाडपुरा) याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपण आपल्या कुटुंबासमवेत घरी असतांना आरोपी तरनुम अब्दुल शेख, उमर चौगुले, जाकीर उमर चौगुले, साजिद खान, नसरीन उमर चौगुले, शबाना समीर चौगुले, समीर उमर चौगुले, शाहीद जमीर चौगुले, ( सर्व रा. कुरण) यांनी जबरदस्ती घरात घुसुन मला व भाऊ, आई, वडील यांना जबर मारहाण केली याप्रकरणी वरील ९ जणांविरुध्द शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सहाय्यक फौजदार ए.आर.वाघ करत आहेत. तर दुसऱ्या फिर्यादी अब्दुल समीर शेख (रा. नाईकवाडपुरा) यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी व तिची बहीण नाईकवाडपुरा येथे गेली असता आरोपी अब्दुल समर हुसेन शेख, हुसेन अमजा शेख, नदीम हुसेन शेख, शहनाज हुसेन शेख, रुबीन शेख, अब्दुल (पुर्ण नाव माहीत नाही)यांनी आम्हाला बेदम मारहाण केली अशी फिर्याद दिली. याप्रकरणी वरील ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक आर. एम. सानप करत आहेत.


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here