निळवंडे कृतीसमितीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला
निळवंडे कृतीसमितीच्या कार्यकर्त्यांवर हल्ला
लोणी(प्रतिनिधी): लोणी-निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर (२१) रोजी दुपारी लोणी गावात प्राणघातक हल्ला करण्यात आला. निळवंडे पाटपाणी कृति समितीचे कार्यकर्ते नानासाहेब शेळके व श्रीकांत मापारी यांच्यावर १०-१२ जणांच्या जमावाने हा केला. या हल्ल्यात त्यांना कोणत्याही प्रकारची गंभीर इजा झाली नाही. यात त्यांचा गाडीचे किरकोळ नुकसान झाले. संबंधीत हल्ला हा पंपावर असलेल्या सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. रात्री उशिरा हल्ल्याबाबत तक्रार अर्ज लोणी पोलिस स्टेशनला देण्यात आला. या घटनेचा सर्वच थरातुन निषेध नोंदवण्यात आला आहे.
You May Also Like: Deepika Padukone Ranveer Singh Marriage Date
शेळके व मापारी हे लोणी येथील भारत पेट्रोल पंपावर डिझेल टाकण्यासाठी गेले असता त्यांचावर १०-१२ जणांच्या टोळक्याने हल्ला केला. सोशल मिडीयावर प्रस्थापिंताविरोधात लिहीत असल्याचा राग मनात धरुन हा हल्ला करण्यात आला. सोशल मिडीयावर जर पुन्हा लिखाण केले तर प्राणास मुकावे लागेल. खोटया गुन्हात अडकवण्याची धमकी देण्यात आली. तसेच शिवीगाळ करुन दमबाजी करण्यात आली. यावेळी जीप मधुन ओडुन मारण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, नानासाहेब शेळके यांनी तेथुन गाडी जोरात काढली. यावेळी गाडीवर पाठिमागुन दगडं मारण्यात आली. नानासाहेब शेळके यांनी संबधीतांच्या हाती गाडी लागु दिली नाही. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.