संगमनेर तालुक्यातील घटना: शेतात काम करीत असताना तरुण महिलेवर भरदिवसा बलात्कार
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे खळबळजनक घटना समोर आली आहे. शेतात खुरपणी करत असणाऱ्या ३५ वर्ष वयाच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
यबाबत माहिती अशी की, पानोडी येथे एक ३५ वर्षीय महिला आपल्या शेतात गवत खुरपनीचे काम करीत होती. तेथे आरोपी अण्णा लहानू घुगे रा. पानोडी हा आला आणि म्हणाला माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्यासोबत चल असे म्हणाला व बळजबरीने शेताच्या कडेला ज्वारीच्या पिकाच्या बांधावर घेवून गेला. या महिलेने जोर जोरात आरडाओरडा केला असता आण्णा लहानू घुगे याने महिलेस ठार मारण्याची धमकी दिली. आणि तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला आणि तो तेथून पळून गेला. या घटनेत महिला जखमी झाली आहे.
याप्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात आरोपी अण्णा लहानू घुगे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
Web Title: Rape of a young woman while working in a field
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436