बोगस गुंतवणूक योजना महिलेला ९ लाखाला फसविले
कोपरगाव | Kopargaon: एक सोन्याची बोगस गुंतवणूक योजना चालवून त्यात गुंतवणूक करायला लावून कोकमठाण येथील एका महिलेला ३ लाख ३३ हजार ९०० रुपयाला गंडा घातला आहे. या फसवणूक प्रकरणी शहरातील वैष्णवी अलंकार गृहाचे मालक बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात अनेक व्यावसायिक सोन्यात गुंतवणूक योजना चालवीत आहेत. अनेक बेकायदा सुरु आहेत. अशाच एका योजनेत कोकमठाण येथील योगिता अजित पवार या महिलेची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून दोघा पिता पुत्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फिर्यादीनुसार आरोपी बाळासाहेब डहाळे व अक्षय डहाळे यांनी ज्वेल गोल्डी प्रा. लि. स्कीम योजना वैष्णवी अलंकार गृहा मार्फत जाहीर केली आहे.
या योजनेत १० ग्राम सोन्याला एक महिन्याला १ हजार रुपये मिळतील असे सांगितले. यानंतर खोटा विश्वास व खात्री देऊन २९ तोळे १३ मिली ग्राम सोने व ६० हजार रुपये घेतले. या सोन्यावर मिळणारी रक्कम न देता या रकमेचे स्कीममध्ये सोने वाढविले आहे असे खोटे सांगितले. त्यांनी संगनमताने ९ लाख ३३ हजार ९०० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार २०१६ पासून चार वर्ष चालू होता असे फिर्यादीत म्हंटले आहे.
Web Title: Kopargaon Fraud investment scheme defrauded woman
कडाक्याच्या थंडीत करा विजेची बचत, पैशाची बचत, आजच बसवा सोलर वॉटर हिटर, नामांकित कंपनीचे (V-Guard, Supreme) सोलर वॉटर हिटर मिळण्याचे एकमेव ठिकाण आर.पी.डी. एनर्जी. संगमनेर, दिवाळीनिमित्त खास ऑफर्स सुरु. संपर्क: 9850540436